समाज कल्याण विभागात स्वातंत्र्य दिन साजरा
       समाज कल्याण विभागाच्या नाशिक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात भारतीय स्वातंत्र्य दिवसानिमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र.१ नाशिक चे उपायुक्त मा.श्री.राजेंद्र कलाल यांच्याहस्ते ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण विभाग,नाशिक श्री.काशिनाथ गवळे,सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण,नाशिक श्रीमती वंदना कोचुरे, संशोधन अधिकारी श्री.खुशाल गायकवाड, सहाय्यक संचालक श्री.हेंमत जाधवर, समाज कल्याण अधिकारी श्री.के.जी.बागूल, विशेष अधिकारी श्री.देविदास नांदगांवकर, लेखाधिकारी श्री.योगेश आंबरे, जनसंपर्क अधिकारी श्री.सुरेश पाटील, शशिकांत पाटील आदी  उपस्थित होते.
      यावेळी शासकीय अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण गीत सादर केले. राष्ट्रगीताने स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी प्रादेशिक उपायुक्त,विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी व सहाय्यक आयुक्त ,विविध मागासवर्गीय महामंडळातील अधिकारी व कर्मचारी व शासकीय वसतिगृहाचे विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पण्या