पोस्ट्स

विशेष लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अद्रकाची शेती दोन एकरावर, उत्पन्न मिळाले १० लाखांवर ! नंदुरबारच्या जितेंद्र पाटलांच्या ‘वावर ची पॉवर’

इमेज
अवकाळी पाऊस, निसर्गाची अनिश्चितता, नापिकी, वातावरणातील बदल यामुळे पारंपरिक शेती अडचणीत आल्याचे चित्र एकीकडे असताना महाराष्ट्रातल्या नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे.  नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी जितेंद्र पाटील यांनी असाच एक प्रयोग केला आहे. पावणे दोन एकरात आले शेतीच्या प्रयोगातून लाखोंची कमाई, जितेंद्र पाटलांनी करून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे. शेतकरी जितेंद्र पाटील यांनी असाच एक प्रयोग केला आहे. पारंपारिक शेतीमध्ये अनेकदा फायदा कमी आणि नुकसान जास्त होते. पांरपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकरी विविध प्रयोग करत असतात. काही शेतकऱ्यांनी तर मिश्र शेतीकडे मोर्चा वळवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने मिरचीच्या शेतीला प्राधान्य देतात. हा जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश सीमेपासून जवळ असल्यानं शेतकऱ्यांना देखील तेथील बाजारपेठांचा मोठ्या प्रमाणावर  फायद...

‘सुधीर’ ची उत्तुंग भरारी !

इमेज
जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी ते बेस्ट सेलर पुस्तकाचा लेखक सध्या मुंबई व उर्वरित महाराष्ट्रात ‘कोरोना’ विषाणूने हाहा:कार माजला आहे. विषाणूमुळे निर्माण झालेल्या ‘लॉकडाऊन’ पर्वात मुंबई येथील वरिष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी लिखित ‘चेकमेट : हाऊ द बीजेपी वन ॲण्ड लॉस्ट महाराष्ट्र’ (CHECKMATE: HOW THE BJP WON AND LOST MAHARASHTRA) पुस्तक प्रकाशित झाले आहे. ‘पेग्विन’ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची आजच्या घडीला महाराष्ट्रात सर्वत्र चर्चा होत आहे. समीक्षक, लेखक, पत्रकार, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या तोडून या पुस्तकाचीच चर्चा होत आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या अर्भुतपूर्व सत्तांतर नाटयामागील अनेक गुपीतांचा गौप्य स्फोट सुधीरने या पुस्तकात केला आहे. त्यामुळे हे पुस्तक आज ‘ॲमेझान बुक पोर्टलवर’ बेस्ट सेलर म्हणून झळकत आहे.         तुम्ही म्हणालं, यात काय विशेष राजकीय पत्रकार म्हटलं की तो पुस्तक लिहिणार त्यात काय अप्रुप आहे. अप्रुप या गोष्टीचे आहे. रत्नाप्रिंपी (ता.पारोळा, जि.जळगांव) या लहानशा खेडयातील जिल्हा परि...

तत्पर मदतीचा 'मुंडे पॅटर्न'

इमेज
दिव्यांग कुटूंबाला आधार ! दोन दिवसांपूर्वी सामाजिक न्यायमंत्र्याकडे मदतीच्या अपेक्षेने गेलेल्या दिव्यांग चक्षू बांधवांनी कल्पना ही केली नसेल अवघ्या ४८ तासात आपल्यास मदत मिळेल. धनंजय मुंडे याच्या रूपानं देवदूतचं लाभल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आली. तत्पर व जलद मदतीच्या या 'मुंडे पॅटर्न' ची आता सर्वत्र चर्चा होत आहे. बीड तालुक्यातील साक्षाळ पिंप्री येथील यादव निवृत्ती क्षीरसागर, विठ्ठलबाई यादव क्षीरसागर, राजाबाई साठे, मुरलीधर साठे व छगूबाई साठे या ५ दिव्यांग चक्षू व्यक्तींना 'दिव्यांग कल्याण निधी'तून प्रत्येकी १ लक्ष रूपयांची मदत करण्यात आली. दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी बीड येथील शासकीय विश्रामगृहात क्षिरसागर व साठे या दोन दिव्यांग चक्षू कुटुंबातील ६ व्यक्तींनी एकत्रितपणे नामदार धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. बीड जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या अत्यंत व्यस्त दिनक्रमात ही या कुटूंबास मुंडे यांनी भेटीसाठी वेळ दिला होता. त्यावेळी मुंडे यांनी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सचिन मडावी , जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू येडके यांना निर्द...

सेवानिवृत्तीनंतर तरूणाईला विनामूल्य मार्गदर्शन करणारा अधिकारी !

इमेज
कोणतेही मानधन नाही…ना प्रवास खर्च…तूम्ही फक्त तरूणाईला एकत्र करा…ते विनामूल्य मार्गदर्शन करायला तुम्ही सांगितलेल्या शहरात हजर…. अशी ख्याती सध्या एका अधिकाऱ्यांची सर्वत्र आहे. ते म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी श्याम देशपांडे.   तरूणाईला लाजवेल असा उत्साह असलेले श्याम देशपांडे सन 2013 मध्ये पुणे विभागीय महसूल आयुक्तालयात ‘अतिरिक्त आयुक्त’ या आयएएस कॅडेर मधील पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आपण घेतलेल्या प्रशासकीय अनुभवाचा सर्वसामान्य तरूणाईला व जनतेला फायदा झाला पाहिजे. यासाठी ते सातत्याने स्पर्धा परीक्षा, व्यक्तीमत्त्व विकास, सामाजिक समस्यांवरील उपाय, स्त्री सक्षमीकरण, अशा विविध विषयांवर विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रभर भटकंती करत आहेत. आतापर्यंत त्यांनी 500 च्या वर व्याख्यानांच्या माध्यमातून असंख्य तरूणांना मार्गदर्शन केले आहे. राजमाता जिजाऊच्या सिंदखेडराजा या भूमीत शासकीय सेवेचा "श्रीगणेशा' आणि शिवरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यात सेवानिवृत्ती हा योगायोग त्यांच्या झळाळत्या कारकिर्दीने पाहिला...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष

वंचितांच्या सामाजिक न्यायच्या दिशेने… राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटक, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या   आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. सामाजिक न्याय विभागाने वंचित घटकांसाठी राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून वंचित/मागासलेला समाज मुख्य प्रवाहात समावेशीत झाला आहे. त्याच्या जीवनमानात बदल झाला आहे. नाशिक विभागात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनेक भरीव उपक्रम / योजना गेल्या काही वर्षापासून सातत्याने राबविण्यात येत आहेत. दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास योजनांच्या अंमलबजावणीस बळकटी प्राप्त होते. त्यादृष्टीने विभागाने भरीव अशा दर्जेदार पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे.       भारतीय सामाजिक व्यवस्थेत महाराष्ट्र राज्याने देशाला महान समाजसुधारक दिलेत. कल्याणकारी राज्यकर्ते दिलेत. त्यामध्ये छ.शिवाजी महाराज, म.ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी असमान दर्जा, असमान संधी या व्यवस्थेला छेद देण्यासाठी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे आरक्...