मुसाफिर – एका अवलिया माणसाचा संघर्षपूर्ण प्रवास

अच्युत गोडबाले या अवलिया माणसाचा उत्कंठावर्धक, चित्तथरारक असा संघर्षपूर्ण प्रवास ‘मुसाफिर’ या आत्मचरित्रात शब्दबध्द करण्यात आला आहे. ‘मनोविकास प्रकाशन’ ने प्रकाशित केलेले ‘मुसाफिर’ हे 464 पानाचे पुस्तक आहे. पुस्तकातील एक एक पान जेव्हा आपण वाचण्यास घेतो. तेव्हा 464 पाने केव्हाच वाचून झालेली असतात हे आपले आपणास कळत नाही. ऐवढे हे आत्मचरित्र अप्रतिम झाले आहे. सोलापूर मधील एक हुशार, लाजरा-बुजरा तरूण पुढे जाऊन जीवनाच्या अनेक क्षेत्रात लिलया वावरतो तेव्हा आपण अचंबित होतो. चित्रपट व संगीताचे प्रचंड वेळ…सोलापूरातील प्रत्येक चित्रपटगृहात केलेली भटकंती…संगीत मग त्यात शास्त्रीय संगीताची आवड…लहानपणी लेखकाला कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर या महान कलाकारांचा सहवास लाभला, त्यातून त्यांच्या संगीताच्या जाणीवा प्रगल्भ झाल्या. सोलापूरमधील लोकजीवन, संस्कृती, परंपरा लेखकाने आत्मचरित्रात उभ्या केल्या आहेत. सोलापूरमधील मित्रपरिवाराशी असलेले ऋणानुबंध…गल्ली-बोळ…चौका-चौकातील वैशिष्टये… खाद्यसंस्कृती, मंदिरे, किल्ले, जत्रा, लोकज...