शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अंतिम संधी
मागासवर्गीय विदयार्थ्यांनी अर्ज भरण्याचे समाज क्ल्याण विभागाचे आवाहन
       शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहामधील मॅट्रिकपूर्व, ज्युनिअर, वरिष्ठ व व्यावसायिक अभ्यासक्रमाची पहिली यादी शासनाच्या संगणक प्रणालीवर प्रसिध्द करण्यात आली आहे. तथापि अद्यापपर्यंत ज्या विदयार्थ्यांनी शासकीय वसतिगृहासाठी ऑनलाईन अर्ज भरता आलेले नाहीत. त्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा पुढील गुणवत्ता यादी लागेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
       मॅट्रिकपूर्व व कनिष्ठ महाविदयालयातील विदयार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज दि. २६ ऑगस्ट २०१५ पर्यंत भरावेत. या अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी दि.२८ ऑगस्ट २०१५ रोजी प्रसिध्द होणार आहे. वरिष्ठ, व्यावसायिक प्रवर्गातील विदयार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज दि.३१ ऑगस्ट २०१५ पर्यंत भरावेत. या अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी दि.२ ऑगस्ट २०१५ रोजी लागणार आहे. यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले ऑनलाईन अर्ज करावेत.
       पहिल्या गुणवत्ता यादीमधील ज्या मागासवर्गीय पात्र विदयार्थ्यांना अद्याप ही वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज सादर करता आलेला नाही. त्या विद्यार्थ्यांनी तात्काळ नमूद कालावधीपर्यंत अर्ज करावा. ज्यांना अर्ज करतांना अडचणी येत असतील त्यांनी त्या-त्या जिल्हयातील सहाय्यक आयुक्त कार्यालयांना आणि शासकीय वसतिगृहाच्या ठिकाणी गृहपाल यांना समक्ष भेटावे. विनामूल्य अर्ज करण्यासाठी गृहपाल व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग कार्यालयांशी संपर्क साधावा. नाशिक विभागात एकूण 49 शासकीय मुला-मुलींचे वसतिगृहे असून नाशिक -13, धुळे – 5, नंदुरबार – 3, अहमदनगर - 16 व जळगांव - 12 येथे वसतिगृह कार्यरत आहेत. पात्र मागासवर्गीय विद्यार्थी व विद्यार्थींनी कृपया सदर योजनेचे लाभ घ्यावा.  लाभ घेतल्यानंतरही ज्या जागा वसतिगृहात रिक्त राहतील. त्या जागांसाठी दुसरी गुणवत्ता यादी लावली जाईल. पूर्वीचे राहिलेले अर्ज व आत्ता उशिराने भरले गेलेले अर्ज यांचा एकत्रीत विचार करुन गुणवत्ता, प्रवर्गनिहाय रिक्त जागा यानुसार दुसरी गुणवत्ता यादी लावली जाईल. दुसऱ्या यादीच्या वेळी ज्या जागा रिक्त असतील त्यासाठीच उशीराने ज्या विदयार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यांचा गुणवत्तेनुसार व प्रवर्गनिहाय रिक्त जागा यांचा विचार करुन त्यांना प्रवेश दिला जाईल. आता उशीराने जे विदयार्थी अर्ज भरणार आहेत. त्यांना पहिल्या गुणवत्ता यादीमधील विदयार्थ्यांपेक्षा जास्त गुण असले तरी त्यांचा विचार पहिल्या गुणवत्ता यादीसाठी केला जाणार नाही. अथवा पहिल्या यादीतील विदयार्थ्यांचे प्रवेश रद्द करुन या विदयार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
       महाविदयालय/शाळा-शासकीय वसतिगृह यांचे मॅपिंग करण्याची सुविधा/अधिकार विभागीय स्तरावरील कार्यालयाला देण्यात आला आहे.ज्या विदयार्थ्यांना वसतिगृह न दिसल्यामुळे अर्ज भरण्यास अडचणी येत असतील त्यांनी त्वरित जिल्हा/विभाग कार्यालयांशी मॅपिंगसाठी सपंर्क साधावा. वसतिगृह प्रवेशासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागासवर्गीय, अपंग अनाथ, दारिद्रय रेषेखालील विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा अनु.जातीसाठी रु.2.00 लाख, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग यांच्यासाठी रु.1.00 लाख, अपंग व अनाथ यांच्यासाठी उत्पन्न मर्यादा नाही. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेले व अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज भरतांना विकल्पामध्ये जेवढी शासकीय वसतिगृहे दिसतील त्या सर्वांना प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे. वसतिगृहासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगींगवर कळविले जाणार आहे. गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी १५ दिवसात शासकीय वसतिगृहात प्रवेश घेणे आवश्यक आहे. प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांचे प्रवेश आपोअप रद्द होणार आहेत.
                                                             (काशिनाथ गवळे)
                                                                       प्रादेशिक उपायुक्त,
                                                                  समाज कल्याण विभाग, नाशिक

टिप्पण्या