समाजकल्याण : (सोशल वेलफेअर). समाजातील दुर्बल व कमकुवत घटकांच्या राहणीमानात सुधारणा करून त्यांना आर्थिक विकासाचा लाभ मिळावा, या भूमिकेतून केले जाणारे सामाजिक प्रयत्न म्हणजे समाजकल्याण. भा रतीय संविधानातील कलम ४६ मधील मार्गदर्शक तत्त्वानुसार , दुर्बल घटक विशेषत: अनुसूचित जाति-जमाती यांच्या शैक्षणिक, सामा-जिक व आर्थिक विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. कल्याणकारी राज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शासनामार्फत उन्नत समाजाच्या प्रगतीबरोबर समाजातील दुर्बल घटक, अल्पसंख्याक, मागासवर्गीय, अपंग, महिला इत्यादींच्या कल्याणासाठी प्रयत्न केले जातात. समाजकल्याण ही स्थल - काल सापेक्ष संकल्पना असल्यामुळे, या विषयीची व्याख्या ठरविताना सामाजिक, आर्थिक व राजकीय पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते. समाजातील वंचित, दुर्बल व मागासवर्गीय जनतेला पूरक व पोषक सहाय्य करणे,हे कल्याणकारी सेवांचे कार्यक्षेत्र होय. परिस्थितीजन्य व इतर अनिवार्य समस्यांमुळे ज्या विशिष्ट व्यक्ती अथवा समुदायांचा सर्वांगीण विकास होत नाही (उदा., वृद्ध, बालके, स्त्रिया, अपंग, दलित, गोरगरीब, आदिवासी इ.) अशा ...