समाज कल्याण विभागाच्या ‘शिपाई’ पदासाठी २० सप्टेंबर रोजी परीक्षा
शहरातील ४ केंद्रावर परीक्षा, विभागातून १७३४ उमेदवारांचे अर्ज
समाज
कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिपाई या (ठोक वेतन) पदासाठी राज्यस्तरावर दि.20 सप्टेंबर 2015 रोजी परीक्षा संपन्न होणार
आहे. नाशिक विभागात एकूण 1734 उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले आहेत. नाशिक विभागातील
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव व अहमदनगर या पाचही जिल्हयातील उमेदवारांची नाशिक शहरातील
4 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे.
दि.20 सप्टेंबर 2015 रोजी
सकाळी 11.00 ते 12.30 या वेळेत ही परीक्षा संपन्न होणार आहे. नाशिक शहरातील अमृतधाम
पंचवटी येथील के.के.वाघ पॉलिटेक्निक महाविद्यालय, के.के.वाघ महिला पॉलिटेक्निक महाविद्यालय
व सरस्वती नगर, आडगांव रोड, नाशिक येथील के.के.वाघ कृषी महाविद्यालय, के.के.वाघ ऑर्टस,
कॉमर्स, सायन्स व संगणक महाविद्यालय या ४ परीक्षा केंद्रावर परीक्षा संपन्न होणार आहे.
परीक्षेकामी एकूण 103 केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व समवेशक अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती
करण्यात आली आहे.
या संपूर्ण परीक्षा पध्दतीचे
व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी शिपाई पदासाठी अर्ज केलेले
आहेत. अशा उमेदवारांनी हॉल तिकिट एम.के.सी.एल.च्या oasis.mkcl.org/dsw या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावेत. असे आवाहन
मुख्य परीक्षा नियंत्रक तथा प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक श्री.काशिनाथ
गवळे यांनी असे आवाहन केले आहे.
टिप्पण्या