महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्ज तात्काळ समाज कल्याण विभागाकडे पाठवावेत.
महाविद्यालय
स्तरावर प्रलंबित अर्ज तात्काळ समाज कल्याण विभागाकडे पाठवावेत.
शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या
वतीने राबविण्यात येत असलेल्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (ई-शिष्यवृत्ती)
अंतर्गत नाशिक विभागातील महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय
स्तरावर प्रलंबित ठेवलेले आहेत. अशा महाविद्यालयांनी त्यांच्यास्तरावर प्रलंबित असलेले
पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज दि.10 ऑक्टोंबर 2015 पर्यंत संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज
कल्याण यांच्याकडे पाठवावेत. तसेच अपात्र विदयार्थ्यांचे अर्ज रद्द करुन महाविद्यालय
स्तरावरील प्रलंबित अर्जांची संख्या निरंक करण्यात यावी. असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त,
समाज कल्याण विभाग, नाशिक श्री.काशिनाथ गवळे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय विभागाने भारत
सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण-परीक्षा फी योजना सन 2011-12 या वर्षापासून
ऑनलाईन राबविण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन झाल्यामुळे
थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परीक्षा फीची रक्कम महाविद्यालयांच्या
बँक खात्यामध्ये वर्ग होत आहे. त्यामुळे या योजनेत पारदर्शकता व गतीमानता आली आहे.
शासनस्तरावरुन ऑनलाईन अर्ज त्वरीत निकाली काढण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. विभागातील
महाविद्यालयांना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयांकडून वेळोवेळी पत्रव्यवहार
व तोंडी सूचना देऊन ही त्यांनी अद्याप त्यांच्यास्तरावर प्रलंबित असलेले मागासवर्गीय
विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयांकडे मंजुरीसाठी
सादर करण्यात आलेले नाहीत.
नाशिक विभागात नाशिक, धुळे ,नंदुरबार, जळगांव व अहमदनगर जिल्हयातील महाविद्यालयांनी सन 2013-14 व सन 2014-15 चे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे
अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत.
वारंवार सूचित करुनही महाविद्यालय स्तरावरील
अर्ज मंजुरीसाठी सहाय्यक आयुक्त यांचेकडे पाठविण्याकडे प्राचार्यांनी दुर्लक्ष केल्याचे
निदर्शनास येत आहे. सर्व प्राचार्यांना पुन्हा विनंती करण्यात येते की, मागासवर्गीय
विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित ठेऊ नये. अन्यथा मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज आपल्या स्तरावर
प्रलंबित ठेवून त्यांच्या शिष्यवृत्तीच्या सवलतीवर गदा आणणाऱ्या महाविद्यालयांचे मा.संस्थाचालक
व मा.प्राचार्यांविरोधात फौजदारी कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना सहाय्यक आयुक्तांना
देण्यात आलेल्या आहेत. तेव्हा विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या कामास प्रथम प्राधान्य
द्यावे. असे आवाहन काशिनाथ गवळे यांनी केले आहे.
अ.क्र
|
जिल्हा
|
सन 2013-2014 मधील अर्ज स्थिती
|
सन 2014-2015 मधील अर्ज स्थिती
|
||
नोंदणीकृत अर्ज
|
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित
अर्ज
|
नोंदणीकृत अर्ज
|
महाविद्यालय
स्तरावर प्रलंबित अर्ज
|
||
१
|
नाशिक
|
97379
|
2231
|
100691
|
6456
|
२
|
धुळे
|
40364
|
122
|
36713
|
1380
|
३
|
नंदुरबार
|
15375
|
232
|
11781
|
292
|
४
|
जळगांव
|
83854
|
2705
|
77416
|
8727
|
५
|
अहमदनगर
|
86757
|
454
|
86001
|
1796
|
एकूण :-
|
323729
|
5744
|
31602
|
18651
|
टिप्पण्या