नाशिककरांना “महासुर्य“ या महानाटयांची २ मे रोजी पर्वणी
नाशिककरांना “महासुर्य“ या महानाटयांची २ मे रोजी पर्वणी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने शास नाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यात “ दूत समतेचा… जागर महामानवाचा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गंत सोमवार दि.२ मे २०१६ रोजी प्रतिभा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर द्वारा प्रस्तुत व सम्यक थिएटर,नागपूर द्वारा निर्मित “ महासुर्य “ या महानाटयांचे नाशिक येथे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेले, १२५ कलावंताच्या ताफांसह, भव्य-दिव्य मंडप, उच्च दर्जांची ध्वनि-प्रकाश योजना ,नेपथ्य, रंगछटा यांचा सुरेख मिलाप असलेले महासुर्य या महानाटयाची अनुभूती घेण्याची पर्वणी नाशिककरांना चालून आली आहे. सामाजिक न्याय विभागाने ही पर्वणी नाशिककरांना उपलब्ध करून दिली असून महानाटयाचा हा प्रयोग गोल्फ क्लब येथील ईदगाह मैदानावर सायंकाळी ६.३०...