नाशिककरांना “महासुर्य“ या महानाटयांची २ मे रोजी पर्वणी

नाशिककरांना “महासुर्य“ या महानाटयांची २ मे रोजी पर्वणी
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजन
            डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने शास


नाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यात “दूत समतेचा… जागर महामानवाचा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गंत सोमवार दि.२ मे २०१६ रोजी प्रतिभा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर द्वारा प्रस्तुत व सम्यक थिएटर,नागपूर द्वारा निर्मित “महासुर्य“ या महानाटयांचे नाशिक येथे आयोजन करण्यात आले आहे.
          डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेले, १२५ कलावंताच्या ताफांसह, भव्य‍-दिव्य मंडप, उच्च दर्जांची ध्वनि-प्रकाश योजना ,नेपथ्य, रंगछटा यांचा सुरेख मिलाप असलेले महासुर्य या महानाटयाची अनुभूती घेण्याची पर्वणी नाशिककरांना चालून आली आहे. सामाजिक न्याय विभागाने ही पर्वणी नाशिककरांना उपलब्ध करून दिली असून महानाटयाचा हा प्रयोग गोल्फ क्लब येथील ईदगाह मैदानावर सायंकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे. ”महासुर्य“ या महानाटयाचे दिग्दर्शन व लेखन डॉ.सुनिल रामटेके यांनी केले आहे. त्यांना प्रख्यात नाटककार डॉ.विनोद इंदूरकर यांचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे.
          या महानाटयाच्या  उद्धघाटन कार्यक्रमांच्या अध्यक्षपदी सामाजिक न्याय मंत्री मा.ना.श्री.राजकुमार बडोले हे असणार आहेत. तर उद्धघाटन जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.श्री.गिरीश महाजन हे करणार आहेत. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.श्री.दिलीप कांबळे, सहकार राज्यमंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.

          सदर महानाटय सर्वांसाठी विनामूल्य असून जास्तीत जास्त नाशिक करांनी या महानाटयाचा लाभ घ्यावा. असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक तथा आयोजक सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.

टिप्पण्या