पोस्ट्स

इमेज
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक संधी !        राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटक, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्गाच्या च्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. या समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सामाजिक न्याय विभाग विभागामार्फत विविध शैक्षणिक विकासाच्या योजना राबविण्यात येतात. नुकताच राज्यात इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी निकाल जाहीर झाला आहे. मागासवर्गीय प्रवर्गांतील लाखो विद्यार्थी या परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्यांच्या भवितव्याचा प्रश्न नेहमीच सतावत असतो. उच्च शिक्षणाचा खर्च कसा पेलणार ? या चिंतेने पालक ग्रासलेला असतो. अशा त्रस्त मागासवर्गीय पालकांना शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध शैक्षणिक विकासाच्या व शिष्यवृत्ती विषयक योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्याचे काम केले जात आहे. शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या शैक्षणिक व शिष्यवृत्ती विषयक योजनांच्या माध्यमातून अनेक आर्थिकदृष्टया हालाखीचे जीवन जगणाऱ्या, मात्र शिक्षणाची...