तत्पर मदतीचा 'मुंडे पॅटर्न'
दिव्यांग कुटूंबाला आधार !
दोन दिवसांपूर्वी सामाजिक न्यायमंत्र्याकडे मदतीच्या अपेक्षेने गेलेल्या दिव्यांग चक्षू बांधवांनी कल्पना ही केली नसेल अवघ्या ४८ तासात आपल्यास मदत मिळेल. धनंजय मुंडे याच्या रूपानं देवदूतचं लाभल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आली. तत्पर व जलद मदतीच्या या 'मुंडे पॅटर्न' ची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
बीड तालुक्यातील साक्षाळ पिंप्री येथील यादव निवृत्ती क्षीरसागर, विठ्ठलबाई यादव क्षीरसागर, राजाबाई साठे, मुरलीधर साठे व छगूबाई साठे या ५ दिव्यांग चक्षू व्यक्तींना 'दिव्यांग कल्याण निधी'तून प्रत्येकी १ लक्ष रूपयांची मदत करण्यात आली.
दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी बीड येथील शासकीय विश्रामगृहात क्षिरसागर व साठे या दोन दिव्यांग चक्षू कुटुंबातील ६ व्यक्तींनी एकत्रितपणे नामदार धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. बीड जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती निवडीच्या अत्यंत व्यस्त दिनक्रमात ही या कुटूंबास मुंडे यांनी भेटीसाठी वेळ दिला होता. त्यावेळी मुंडे यांनी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सचिन मडावी , जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू येडके यांना निर्देशित करून दिव्यांग बीज भांडवल योजना व जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या शेष फंडातून भरीव आर्थिक मदत करण्याबाबत सूचित केले होते.
मदतीच्या अपेक्षेने आलेल्या या दिव्यांग चक्षू कुटूंबाला तात्काळ त्याच दिवशी आर्थिक मदतीची घोषणा करून मुंडे साहेबांनी सुखद धक्का दिला. नुसती घोषणा करून न थांबता २६ जानेवारी रोजी रात्री १ वाजता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मदतीच्या धनादेशावर पहिली सही करून ४८ तासातचं आश्र्वासन पूर्ती केली. महाविकास आघाडी सरकार मध्ये एक नवा आदर्श घालून दिला आहे.
आज,दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी पोलीस मुख्यालयाच्या मैदानात आयोजित शासकीय ध्वजा रोहनाच्या मुख्य कार्यक्रमात या कुटूंबातील पाचही व्यक्तींना शासकीय मदतीच्या प्रत्येकी एक लाख रुपयांच्या धनादेशाचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन मडावी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू येडके, आमदार संदीप क्षीरसागर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या शिवाजी शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याच परिवारातील कु. सम्राट क्षीरसागर याचे वय १८ वर्ष पूर्ण नसल्याने मदत निधी न देता त्याचा शिक्षण व पूरक खर्चासाठी शिष्यवृत्ती देण्याचेही नामदार धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.

टिप्पण्या