पोस्ट्स

समाज कल्याण आयुक्तांनी साधला शासकीय वसतिगृह्यांच्या मुलींशी सहज संवाद !

इमेज
जाणून घेतल्या मुलींच्या समस्या वेळ सकाळची... ते येतात... मुलींशी  सहज संवाद करतात...  आपल्या पैकी कोण सीईटी परीक्षेची तयारी करत आहे ? क्लास लावला आहे का ? अभ्यासिका चांगली आहे का ? इंटरनेट सुविधा आहे का ? जेवण चांगले आहे का ? स्वच्छता चांगली आहे का ? परिसर कसा आहे? असल्या प्रकारचे  असंख्य प्रश्नांची सरबत्ती करून आस्थेवाईक पणे मुलींशी संभाषण करणारे दुसरे- तिसरे कोणी नसून समाज कल्याण आयुक्त श्री. मिलिंद शंभरकर हे होते.  राज्याचे समाज कल्याण आयुक्त श्री. मिलिंद शंभरकर यांनी सकाळी शनिवार, दि.28 मे 2018 रोजी  समाज कल्याण विभागाच्या नाशिक - पुणे रस्त्यावरील मुलींच्या शासकीय वसतिगृहास  भेट दिली. त्यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थीनिचि  आपुलकीने विचारपूस करत सहज संवाद साधला.  यावेळी प्रादेशिक उपआयुक्त श्री. राजेंद्र कलाल, विशेष अधिकारी श्री. देविदास नांदगावकर, गृहप्रमुख श्रीमती सरिता रेड्डी,श्रीमती सविता गवारे, श्रीमती नंदा रायते व सुभाष फड आदी उपस्थित होते.  यावेळी श्री. शंभरकर यांनी मुलींना आपली नियमित आरोग्य तपासणी ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष

वंचितांच्या सामाजिक न्यायच्या दिशेने… राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटक, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या   आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. सामाजिक न्याय विभागाने वंचित घटकांसाठी राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून वंचित/मागासलेला समाज मुख्य प्रवाहात समावेशीत झाला आहे. त्याच्या जीवनमानात बदल झाला आहे. नाशिक विभागात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनेक भरीव उपक्रम / योजना गेल्या काही वर्षापासून सातत्याने राबविण्यात येत आहेत. दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास योजनांच्या अंमलबजावणीस बळकटी प्राप्त होते. त्यादृष्टीने विभागाने भरीव अशा दर्जेदार पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे.       भारतीय सामाजिक व्यवस्थेत महाराष्ट्र राज्याने देशाला महान समाजसुधारक दिलेत. कल्याणकारी राज्यकर्ते दिलेत. त्यामध्ये छ.शिवाजी महाराज, म.ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी असमान दर्जा, असमान संधी या व्यवस्थेला छेद देण्यासाठी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे आरक्...

दैनिक दिव्यमराठी, नाशिक आवृत्ती दि.14 एप्रिल 2018 रोजी वृत्तपत्रात छापून आलेला माहितीपूर्ण लेख

इमेज

रावसाहेब थोरात सभागृहात दि.6 मार्च 2018 संपन्न “ॲट्रोसिटी” कार्यशाळेचे वार्तांकन

इमेज

प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक व समाजकार्य महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.6 मार्च 2018 रोजी “नागरी संरक्षण अधिनियम-1955, अनुसूचित जाती- जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम – 1989 व विविध सामाजिक कायदे” या विषयावरील विभागीय कार्यशाळेचे उद्घाटन न्यायमूर्ती श्री.सी.एल.थूल यांच्याहस्ते झाले.

इमेज

विद्यार्थ्यांच्या शालेय पाठ्यपुस्तकात सामाजिक कायद्यांचे ज्ञान दिले जावे – न्यायमुर्ती सी. एल. थूल रावसाहेब थोरात सभागृहात “ॲट्रोसिटी” कार्यशाळा संपन्न

इमेज
“ समाजातील सामाजिक सलोखा व चांगले वातावरण टिकून राहण्यासाठी निर्माण झालेल्या सामाजिक कायद्यांविषयी विद्यार्थ्यांच्या शालेय पाठ्यपुस्तकात या विषयांचे ज्ञान दिले जाणे गरजेचे आहे. ” असे प्रतिपादन राज्य अनुसूचित जाती - जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सी.एल.थूल यांनी आज येथे केले.             प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक व समाजकार्य महाविद्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.6 मार्च 2018 रोजी   “ नागरी संरक्षण अधिनियम-1955, अनुसूचित जाती- जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम – 1989 व विविध सामाजिक कायदे ” या विषयावरील विभागीय कार्यशाळेचे उद्घाटन न्यायमूर्ती श्री.सी.एल.थूल यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमांच्यास अध्यक्षस्थानी नाशिक विभागीय आयुक्त श्री.आर.आर. माने, समाज कल्याण आयुक्तालय,पुणे चे अतिरिक्त आयुक्त श्री.सदानंद पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) चे प्रकल्प संचालक श्री.लक्ष्मीकांत महाजन,   प्रादेशिक उपायुक्त, सम...

कळसुबाई शिखर सर करतांना एव्हरग्रीन ग्रुप, दि.१८ फेब्रुवारी २०१८

इमेज