ॲट्रोसिटी गुन्हयांतील पोलीस तपासावरील व न्यायालयात प्रलंबित गुन्हयांचा त्वरीत निपटारा करावा - विभागीय आयुक्त एकनाथ डवले
विभागीय दक्षता
व सनियंत्रण समितीत व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून आढावा
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार
प्रतिबंध अधिनियमात पोलीस तपासावरील व न्यायालयात प्रलंबित असलेल्या गुन्हयांचा लवकरात लवकर निपटारा झाला पाहिजे. यासाठी
पोलीस, महसूल व समाज कल्याण प्रशासनाने समन्वयाने कामकाज करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन
नाशिक महसूल विभागीय आयुक्त मा.श्री.एकनाथ डवले यांनी आज येथे केले.
विभागीय दक्षता व संनियत्रण
समितीत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम-1989 कायदाबाबत विभागीय आयुक्तांनी
मंगळवारी दि. 20 सप्टेंबर 2015 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून नाशिक विभागातील
सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण
यांचा आढावा घेतला. यावेळी नाशिक महसूल आयुक्तालयात प्रादेशिक उपायुक्त श्री.काशिनाथ
गवळे व नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपअधिक्षक श्री.देवेंद्र शिेंदे, नाहसं चे पोलीस
निरीक्षक श्री.धनंजय जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
नाशिक विभागात अनुसूचित जाती-जमाती
अत्याचारांच्या गुन्हयांचा जलद गतीने निपटारा व अत्याचार बाधितांचे पुर्नवसन याबाबतीत
पोलीस व समाज कल्याण प्रशासनाने सजग राहून काम केले पाहिजे. चार्जसिट दाखल झाल्यावर
तात्काळ अत्याचार बाधितांना शासकीय मदत मिळेल यासाठी तत्परतेने प्रशासनाने काम करावे.
असे ही श्री.डवले यांनी यावेळी सांगितले. ॲट्रोसिटी गुन्हयांचा जलदगितीने निपटारा करण्यासाठी
या केसेस फॉस्ट ट्रक कोर्टात चालविण्यात याव्यात अशा सूचना यावेळी विभागीय आयुक्त मा.श्री.एकनाथ
डवले यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.
श्री.काशिनाथ गवळे यावेळी म्हणाले,
अत्याचाराचा गुन्हा घडताच पोलीस अधिकारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी अत्याचारग्रस्तांची
भेट घेऊन गुन्हयांचा तपास व मदतीच्या बाबतीत युध्दपातळीवर काम करावे. जेणेकरुन अत्याचारीत
व्यक्ती, कुंटूंब यांना वेळेवर शासकीय मदत मिळणे शक्य होईल.
नाशिक विभागात सप्टेंबर
2015 अखेर आर्थीक मदतीसाठी एकूण 178 गुन्हयांपैकी 74 गुन्हयांना तात्काळ मदत देण्यात
आली आहे. तर 104 गुन्हे हे पोलीस तपासावर असल्याने त्यांना अद्याप मदत देण्यात आलेली
नाही. या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीला नाशिकचे निवासी जिल्हाधिकारी श्री.रामदास खेडकर,
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुखदेव बनकर, धुळे जिल्हाधिकारी आण्णासाहेब मिसाळ, मुख्य
कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, नंदुरबार जिल्हाधिकारी प्रदीप पी, मुख्य कार्यकारी
अधिकारी राधाकृष्ण गमे, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती अनिता पाटील, जळगांव जिल्हाधिकारी
श्रीमती रुबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आस्तीकुमार पांडे, अहमदनगर जिल्हाधिकारी
श्री.अनिल कवडे आदी यावेळी उपस्थित होते.
टिप्पण्या